Sunday, July 25, 2010

किडे करणारा किडा...

Prescott Hall च्या समोर दर महिन्याला नवीन फुलझाडं लावतात...त्यांचे आयुष्य फक्त १ महिना असते पण त्यांच्या वरती अनेक किड्यांचे संसार असतात...




नाकतोडा माझा आवडता किडा आहे...लहानपणी खूप घाबरायचो....पण नंतर दुर्गापुरला असताना त्याला पाळला होता..हा नाकतोडा माझ्या घरच्या बाहेर आला होता...आणि attitude देत होता...


Saturday, July 17, 2010

Prescott Hall....माझं दुसरं घर

उन्हाळा सुट्टी मध्ये संध्याकाळी आकाश वेड लावायचे..."Romantic" काय ते म्हणतात तसे असायचे... मग हळू हळू रात्र व्हायची ...तेव्हां मी कॉलेज ला जायचो...हा hall माझं दुसरं घर झाला होता...तशी खूप जुनी इमारत पण तिच्या प्रेमात आहे...मी...







हे दिवे आणि विटा एक वेगळेच चित्र तयार होते...



Flash ठेवून मला फोटो काढलेले आवडत नाही म्हणून हात खूप स्थिर ठेवून फोटो काढायचा प्रयत्न करतो...कधी कधी हलतात पण डोळ्यांना दिसते तसे फोटो येतात.......

.




Saturday, July 10, 2010

असेच काही माझे आवडते फोटो ....

Cookeville चे railway Museum ... मला एकडे गेल्या वर एक प्रकारची शांती मिळते...रेल्वे रुळाचे फोटो काढताना एक symmetry वाटते.

हा फोटो काढताना मी माझं हात गुडघ्यावर स्थिर ठेवला होता...३० फोटो घेतल्या वर हा फोटो मिळाला...

शशी थरूरचे पुस्तक आणि कॉफी अशी मैफिल फार कमी वेळी जमून येते....

एकट पान असं रस्त्यावरचे ....मला मोहब्बते ची आठवण झाली...त्यावरचे जलबिंदू टिपून घ्यावेसे वाटत होते...

हीच माझी cycle !

cookeville मधले चर्च आणि त्यामागचा चंद्र...



Poets कॅफे ...नावातच सगळ आहे...कॉफी घेऊन बसायची आणि वाचायला एखादे पुस्तक...किंव्हा सरळ पत्ते कुटायचे...

Sunday, July 4, 2010

बदक बदक .. भुर्र....

हा एक माझं आवडता विषय आहे ....आणि ही बदकं pose पण अगदी मोडेल ला लाजवतील अशी देतात...
जरा उन्हं उतरल्यावर सावली मध्ये मला फोटो काढायला आवडतात...

हे आहे सोनेरी बदक...या दिवशी मला असे काहीच फोटो मिळाले आणि माझी battery संपली....

लहानपणी बदकाची गोष्ट होती आणि त्यात एक odd बदकाचे पिल्लू असते...


या कुंटुंबातील बदक नर कसला स्मार्ट आहे बघा...आणि सावली मुळे तो उठून दिसतो...


.
Posted by Picasa

काही जमून आलेले फोटो..

उन्हाळा सुट्टी मध्ये संध्याकाळी मी खूप वेळा केन क्रिक वरती फिरायला जायचो....तेव्हां माझे कॅमेरा बरोबर प्रयोग चालू असायचे....मला सगळ्यात जास्त aperture बरोबर खेळायला आवडते...त्यातलाच हा पहिला फोटो...


हे सरोवाराबाजुचे घर म्हणजे माझे स्वप्नातले घर आहे..त्या घराचे माझ्याकडे अनंत फोटो आहेत...
href="http://4.bp.blogspot.com/_sSs1r2m0kMg/TDDejGvllFI/AAAAAAAADr4/b-Cd-z11hGQ/s1600/DSCN5101.JPG">
माझ्या wishlist मध्ये rowing boat आहे...कधी तरी विकत घेईन...


या फोटो ला मी फक्त त्या जागी कॅमेरा घेऊन होतो म्हणून हा फोटो मिळाला...त्या प्रतीबिम्बामुळे फोटो ला वेगळेच कोंदण मिळाले...
Only