Tuesday, January 4, 2011

वर्षाची समाप्ती Fall Creek Falls स्टेट पार्क मध्ये ....

३१ डिसेंबर ला कुठे जायचे हा मोठा प्रश्न होता...एकडे आमच्या गावात ३१ची रात्र पुण्या-ठाण्यासारखे लोक रस्त्यावर येऊन साजरी करत नाही म्हणून अशी जागा पाहिजे होती की मजा पण करता आली पाहिजे आणि जरा हटके पहिजे .....क्लब ला तर प्रत्येक विकेंड ला चक्कर असते त्यामुळे तो पर्याय कधीच बाद होता...

हो नाही करता करता Fall Creek Falls स्टेट पार्क ला जायचे ठरले ...आधी कॅम्पिंग चा मूड होता पण तापमान शून्याच्या खाली बघून तो बदलावा लागला...(वेदर डॉट कॉम झिंदाबाद !)शिस्तीत एक घर २ दिवसासाठी बुक केले ...अगदी कमीत कमी गोष्टी घेऊन निघालो...


हीच ती आमची कॅबिन ...सगळ्या सुखसोयीयुक्त अगदी ओव्हन, टोस्टर पण...पार्कच्या आत मध्ये ..आजूबाजूला जंगल,पक्षी आणि शांतता . ..कॅबिन च्या मागे एक मोठा गरम पाण्याचा झाकुजी टब ......म्हणाल तर सगळ्या सुखसोयी त्या पण जंगलच्या मध्य भागी....



२०१० ची शेवटची संध्याकाळ ...मी एकटाच जंगलच्या मध्यभागी ....आजूबाजूला कोणी नाही ...फुल भारी...निळाई मनात घुसत होती...



निळा चकवा ! हा फोटो माझ्या कडे wide angle लेन्स असती तर बेक्कार भारी आला असता...



Fall creek falls स्टेट पार्क अमेरिकेतले खूप चांगल्या पार्क मधले आहे...याचे मुख्य आकर्षण म्हणजे हा धबधबा..तो बघताना आरश्यातले एका धबधब्याचे प्रतिबिंब बघतो आहे असं भास होतो.. त्या दोन दिवसात खूप पाऊस पडत होता त्यामुळे जास्त फोटो काढता आले नाही...



"Aperture" जास्त ठेवून हा फोटो काढला ....SLR नसल्यामुळे जास्त प्रयोग करता आला नाही...



हा रस्ता पहिल्या वर मी मानाने लोणावळ्याला पोचलो होतो...



याच पानांना काही दिवसापूर्वी स्वतःचे एक अस्तित्व होते ...पण आत्ता रंगदे बसंती च्या DJ च्या भाषेत तीच पाने दुनियाच्या झमेल्या मध्ये हरवून गेली आहेत...

Monday, December 27, 2010

बर्फातले काही पराक्रम .....


नाताळ ची सुट्टी लागली आणि मी अभ्यासातून मोकळा झालो ....मागचे काही दिवस खूप बर्फ पडत होता आम्ही घरी बसून कंटाळलो होतो ...मग असच डोक्यात आले की Center Hill Lake ला जाऊ...हा तलाव आमच्या गावाजवळ स्मिथविले ला आहे...एका धरणाचे पाणलोट क्षेत्र आहे...गुगल केले आणि ५ मिनिटात निघालो आम्ही...आणि नंतर..........


नकाश्यावरून शोधत शोधत एका कच्च्या रस्त्यावर पोचलो...बाहेर खूप बर्फ पडत होता तरी गाडी आम्ही पुढे नेली ...आणि मग शेवटी ती अडकून बसली....कसे तरी करून गाडी बाहेर काढली आणि त्या जंगलातून परत निघालो...विचार केला तेंव्हा कळले की तो रस्ता direct पाण्यात जात होता...नशिबाने आम्ही तो रस्ता follow नाही केला...:)



बर्फ पडत आहे ...बाहेर तापमान -५ च्या खाली आहे....आणि आम्ही वेड्या सारखे बाहेर पडलो आहोत...



असे कष्ट करून शेवटी आम्ही त्या लेक च्या जवळ पोचलो...पण अंधार झाला होता...हा एकच दिवा त्या निळ्या अंधारामध्ये उठून दिसत होता...



हा तो Center Hill lake.मला वरसगाव किवा खडकवासला आठवले तिकडे पण मी कणीस वाला शोधायचा निष्फळ प्रयत्न केला....



एकटी झाडं मला खूप आवडतात....माझा तो फोटोग्राफी मधला weak point आहे,...मला नेहमी वाटायचे की असं उन्हातानात एकटे लढणारे झाड ब्रेकअप चे प्रतिक आहे...;)



बर्फ नुकताच पडून गेला की घरं अफलातून दिसतात....आणि वरती निळे आकाश असेल तर दुधात साखर...



हे स्वप्नातले घर तुम्ही म्हणू शकतात...बाहेरून इतके भारी दिसते आतून कसे असेल...



असच फिरता फिरता मला ही "कॅडीलाक" दिसली आणि मला एकदम दिवार चा पाठलाग आठवला...काय गाडी होती ती...! ज्याची गाडी होती त्याने अगदी मनापासून जपली होती...

Monday, December 20, 2010

Whiskey Lullaby ..एका विश्वासघाताचे गाणे !

जेंव्हा मी country ऐकायला चालू केले तेंव्हा मला गायक माहित नव्हते म्हणून मी असाच शोधाशोध करत गाणी ऐकायचो.खूप वेळा अशी सुंदर गाणी मिळायची की ती मी सतत ऐकत बसायचो...पूर्वी गाण्यांच्या बाबतीत असे माझे कधीच झाले नव्हते

लहानपणा पासून हिंदी आणि मराठी गाणी आजूबाजूच्या लोकांकडून आपल्याला समजत जातात त्याप्रमाणे आपली आवड निर्माण होते..पण मी अशी "गाणी शोधणे" वैगैरे प्रकार केले नाही....पण अशा मध्ये मला "Country गाणी शोधणे" याचे मला व्यसन कधी लागले हे समजले पण नाही...

अश्याच एका शोध मोहिमेमध्ये मला हे Brad Paisley चे हे गाणे सापडले...गाणं ऐकून झाल्या वर माझ्या भावना सुन्न झाल्या...जी काही गिटार टून आहे तीच टून वाट लावून टाकते ....

या गाण्याचे नाव आहे "Whiskey Lullaby" म्हणजे दारूचे अंगाई गीत...शब्दशः हा अर्थ थोडा विचित्र वाटेल तुम्हाला पण गाणं ऐकले की संदर्भ लागेल...



तो एक सैनिक असतो...आत्ता युद्ध संपले असते तो परत येत असताना त्याला त्याच्या प्रेयसी ने दिलेले वचन आठवत असते...खरतर म्हणजे त्या प्रेयसीच्या ओढीनेच त्याला सुखरूप आणले असते...त्याच खुशीत तो तिला भेटायला जातो आणि ......"ती आणि परपुरुष "..

तो संपतो . विश्वासघात तो सहन नाही करू शकत ..त्याचे दुःख दारूत बुडवायचा प्रयत्न करतो...तिची आठवण त्याच्या हृदयात असते त्यामुळे दारूमुळे पण तो तिला विसरू शकत नाही..."life is short but this time its bigger"....

मरताना पण तो तिला विसरू शकत नाही...कारण ती त्याची जगण्याची प्रेरणा असते..

ती पण त्याची आठवण घालवू शकत नाही...या जन्मी तिला हे शक्य नसते...ती पण दारू पिऊन त्याला भेटायला परलोकी निघून जाते...

ते दोघा कायम झोपी जाताना देवदूत Whiskey Lullaby गात असतात...
या गाण्याबरोबर याचा video पण तेवढाच घुसतो...पुढचे दोन दिवस हलवून टाकतो...

Friday, December 17, 2010

बर्फाळ प्रदेशातला फोटोग्राफर ...

मी खूप दिवसापासून थंडीची वाट बघत होतो...आणि शेवटी तापमान शून्य च्या खाली गेले ...एकदिवस उठलो बाहेर बर्फ पडत होता,हळूहळू सगळ्या गोष्टी बर्फाखाली जाऊ लागल्या...पण नेमका माझा final week असल्याने त्या बर्फाच्या वादळात कॉलेज ला जावे लागले...शेवटी परीक्षा संपल्या आणि कॅमेरा बाहेर पडला...-८ ते -११ सेंटीग्रेड ला फोटोग्राफीची मजा परत एकदा अनुभवली...


आमच्या कॉलेज जवळून रेल्वेचे रूळ जातात ... त्या रूळावर चालण्यात एक वेगळीच मजा येत होती..रुळाच्या क्रॉसिंग वरती खूप सही abstract तयार झाले होते त्याला मी ब्रेक अप abstract म्हणतो...;)



संध्याकाळी म्हणजे ४ वाजता मी आणि अक्षय ने केन क्रीक लेक ला जायचे ठरवले...मागचे काही दिवस तापमान -५ च्या खालीच होते म्हणून आम्हाला वाटले की लेक गोठला असेल...(माझे पहिले पोस्ट ) पण पोपट झाला ....त्या नादात आमची गाडी बर्फात फसली...battery down झाली..

केन क्रीक चा सगळा परिसर पांढरा शुभ्र होता ..झाडांची पानझड झाली होती....



हा फोटो काढताना माझे हात संपले होते...मी gloves विसरलो होतो पण समोरचे दृश्य बघून थंडी विसरलो आणि कॅमेरा सेट केला...



भाऊ भाऊ "romantic काय ते याचं जागेला म्हणतात का?"



या दिव्याला बघून मला बिरबलाची खिचडी आठवली...पण पाण्यात पाय घालायची हिम्मत नाही झाली...


हे माझ्या घरासमोरचे community center आहे ....रोज सूर्य मावळताना फक्त २ मिनिट हा देखावा बघयला मिळतो...
त्या २ मिनटासाठी मी खूप दिवस थांबलो होतो...

Wednesday, December 1, 2010

माझ्या आजोबांची गोष्ट .."He walked on water "

या गाण्याला मी आजोबांचे गाणे म्हणतो...मी माझ्या आजोबांना कधी पहिले नाही.लहानपणी खूप वेळा आई-बाबांकडून त्यांच्या गोष्टी ऐकल्या आहेत...माझ्या साठी ते एक महान वक्ती आहे...अशी वक्ती की जिचे वर्णन मी शब्दात नाही करू शकत...म्हणून मी जेव्हां मी गाणं ऐकतो तेंव्हा मला माझे आजोबा आठवतात...स्थळ-काळ जरी वेगळा असला तरी मला काही फरक पडत नाही कारण " grandpa " म्हणलं काय आणि "आजोबा " म्हणलं काय दोन्ही माझ्या साठी देवासमान वक्ती आहेत....
Randi Travis हा ऐंशी च्या दशकातला खूप प्रसिद्ध कंट्री गायक..त्याचे हे त्याच्या आजोबांवारचे गाणे आहे...


प्रत्येक लहान मुलाला विश्वास असतो की आपले आजोबा, आपली आज्जी खूप असामन्य आहे...कारण त्यांच्याकडे गोष्टींचा खजिना असतो.....तसेच या लहान मुलाला पण वाटते की आपले आजोबा जगातली काही पण अशक्य गोष्ट शक्य करू शकतात...."अगदी ते पाण्यावरती पण चालू शकतात "(he walked on the water !)

त्याने फक्त आजोबांच्या बंदूक चालवायच्या आणि घोडेस्वारी च्या गोष्टी ऐकल्या आहेत...लहान मुलांना या गोष्टीचे वेड असते ...तसेच या मुलाचे होऊन गेले आहे ..त्याच्या विश्वात त्याचे आजोबा म्हणजे हिरो आहेत....

आजोबांचे ऐकून तो पण झाडूला घोडा बनवून चालवतो तेव्हां त्याचे आजोबा खूप खुश होतात....त्याला पण आजोबांची टोपी घालून एकदम मोठं व्हायचे आहे .....

शेवटी त्याचे आजोबा देवाघरी जातात तेंव्हा तो खूप रडतो....पण अजून पण त्याचा विश्वास कायम आहे....की त्याचे आजोबा पाण्यावरती चालू शकतात..."he walked on water " !
मला माहित आहे की प्रत्येकाला असे कधी नाही कधी वाटले असेल त्यांच्या साठी हे गाणं मी dedicate करतो...

Tuesday, November 23, 2010

शिशिर ऋतूचे शेवटचे सोनेरी दिवस ...

रविवार सकाळ फुल मनाची तयारी करून मी कॉलेज ला निघालो होतो पण आकाश बघून कॅमेरा साठी हात शिवशिवायला लागले .मग मी आणि माझा कॅमेरा ...बाकीचे सगळ जग विसरून गेलो पुढचे काही तास..

डेरीबेरी हॉल च्या जवळची काहीच झाडं अजून आपले सोंदर्य टिकवून आहेत...त्याच्या खाली एक असाच कोणीतरी येऊन बसला आणि मला तो subject मिळाला...


या झाडाचा मी जबरदस्त fan आहे....या झाडं सोबत ही बिल्डिंग आणि वरती निळेशार आकाश...



त्या दिवशी सूर्य लपाछपी खेळत होता आणि मी थांबून थांबून फोटो काढत होतो...



आत्ताचे हे दिवस शिशिर ऋतू संपत आल्याचे दिवस ....ही अशी अनेक विखुरलेली एकटी पाने मन उदास करून जात होती ...



काही दिवसात ही झाडं निष्पर्ण होऊन जातील आणि मग एक प्रकरचे भकास वातावरण निर्माण होईल ...पण हे काही महिन्यांसाठीच असे मनाला बजावत होतो....



ही cycle उचलावी आणि पळून जावेसे मला वाटत होते...romantic जागा म्हणजे काय ? हे हा फोटो बघून समजेल..


या पायऱ्या तश्या फार सध्या होत्या ......त्या मला आधी दिसल्याच नव्हत्या पण जेव्हां दिसल्या तेव्हां माझ्या डोक्यात फ्रेम तयार झाली...त्या light च्या खांबामुळे फोटो ला एक वेगळाच लूक आला..



हे सुंदर झाड एका माणसाला dedicate केले आहे....काय सही concept आहे....तो माणूस सापडला मला तर मी हा फोटो त्याला नक्की mail करीन...


हा या शिशिर ऋतू चा शेवटचा फोटो....या झाडाचे माझ्या कडे १०० एक फोटो असतील... मागच्या वर्षी मी या झाडासाठी वेडा होतो.. या झाडामुळेच या सध्या इमारतीला एक वेगळेच कोंदण प्राप्त झाल आहे....

Saturday, November 13, 2010

जीवनाचे साधे सोपे तत्वज्ञान !


एकडे आल्यावर मला एक जाणवले की अमेरिका मधले खूप लोक एकाकी जीवन जगतात...तरुणपणी खूप काम करून पैसे कमवायचे आणि मजा करायची पण नंतर मुले त्यांच्यात्यांच्या मार्गी निघून गेली की यांच्या समोर "वेळ" कसा घालवायचा हा प्रश्न पडतो.. पुण्यातले सारखे चला शेजारी,कट्यावर,पर्वतीला जाऊन गप्पा मारण्यासारखे यांना कोणी मिळत नाही....आणि मग चालू होते "शेवटचे दिवस मोजणे".......

(खूप गंभीर अशी सुरवात झाली पण त्याची गरज होती..)

हे गाणं आहे "Billy Currington" चे एकदम शांत आणि फक्त गिटार वर वाजवलेले.
या बिली ला एक आजोबा बार मध्ये भेटतात आणि तो गप्पा गोष्टी चालू करतो....वास्त्वतः कोणी बार कोणी आजोबांची गप्पा मारत नाही पण हा बिली त्या एकाकी आजोबांची कहाणी ऐकायला लागतो...त्यांच्या बोलण्यातून कळते त्यांनी २ युद्धात पराक्रम गाजवला पण कुटुंब जपण्यात अयशस्वी ठरले...२ मुल असून ती असून नसल्या सारखी आहेत... अश्याच गप्पा रंगत जातात गावातले राजकारण ,नवीन मुली त्यांची प्रकरणे असेच अनेक काही......आणि आजोबा खुलतात....
त्यांचे अनुभवाचे शब्द येतात "god is great,beer is good ,people are crazy !" बिली त्याचा एकाकी पणा दूर करायला मदत करतो....
रात्र संपताच दोघा आपले आपले रस्ते पकडतात...परत कधी ना भेटण्या साठी...

एका सकाळी बिली पेपर मध्ये बातमी वाचतो की ते आजोबा करोडपती होते...आणि त्यांनी...त्यांची सगळी कमाई बिली च्या नावावर केली आहे....
बिली ला १००% पटते की...." god is great...beer is good....people are crazy !"

याचा video पण तेवढाच सुंदर आहे.....आपल्याला पण असा खूप वेळा अनुभव येतो...एकाकी वाटले तर एवढच लक्षात ठेवा " god is great...beer is good....people are crazy"