Wednesday, August 18, 2010

धडक गाडी आणि पाळीव प्राणी .....

Cookeville च्या जत्रेमध्ये ही माझी आवडती जागा होती.याला एकडे "pet zoo " म्हणतात .या मध्ये लोक येऊन बकरी,उंट ,बैलाला खाऊ घालू शकतात .साप ,अजगर ,कांगारू ,गिनिपिग बघू शकतात .पण मला त्यांच्या cage ची condition बिलकुल आवडली नाही .छोट्याश्या box मध्ये मोठा Burmese python (अजगर) होता .या खालच्या फोटो मध्ये बॉल अजगर (ball python)आहे .त्याच्या मागच्या बाजूला एक सरडा पुन तुम्ही बघू शकतात .या दोन्ही जातींना hiding जागेची गरज असते,पण तीच या cage मध्ये दिसत नाही.


बिचारे कांगारू .त्याला सोडून द्यावेसे वाटत होते.

हा अजून एक अमानुष प्रकार होता .हे pony त्या दोरीला बांधले होते आणि लोक त्यांच्या वर बसून गोल गोल फिरत होते ...मला तेलाच्या घाण्याची आठवण झाली...


नंतर आम्ही Demolition Derby बघयला गेलो .नावच खूप मोठे होते जास्त काही नव्हते.जुन्या गाड्या चिखला मध्ये धडक गाडी धडक गाडी खेळत होत्या.तिकडे हा मुलगा dude दिसत होता.

भसा भासा soft drink पीत होती .मी विचार करत होतो की मोठी झाली की तिच्या आई सारखी बेक्कार जाडी होणार...

या सगळ्या जुन्या गाड्या मैदाना मध्ये आल्या आणि मग चालू झाली "Demolition Derby".पिंक गाडी माझ्या आवडीची होती आणि तीच शेवट पर्यंत टिकली...


असे fire fighters जागोजागी थांबले होते.पण एकदाच छोटी आग लागली .

त्या गाड्या सारख्या चिखलात रुतून बसत होत्या .फक्त काहीच गाड्या फुल फॉर्म मध्ये होत्या.

असा धूर निघून त्या गाडीचा शेवट झाला.पण मजा आली बघयला.

Saturday, August 14, 2010

Cookeville ची जत्रा !

ही आहे Cookeville ची जत्रा .आमचे गाव तसे छोटे तालुक्याचे गाव आहे..म्हणून जशी तालुक्याच्या गावी जत्रा येते तश्शीच एकडे आली.मी माझ्या रूममेट्स बरोबर सोमवारी गेलो म्हणून जरा निवांत पणे फोटो काढता आले.खूप साधी लोक बघायला मिळाली .खूप लहान मुले त्यांची मस्ती ,फुगे ,पोपकोर्न ,खूप साऱ्या rides बेक्कार मजा केली.





हे Giant Wheel खूप हळू हळू फिरत होते पण त्यामुळे चांगला फोटो घेता आला.

या ride चे नाव हिमालय का ठेवले ते त्या ride वाल्या ला माहित !....ही गोल गोल फिरणारी ride होती..

या ride चा motion मध्ये फोटो घ्यायचा प्रयत्न करत होतो पण प्रकाश कमी असल्याने फोकस नीट झाला नाही...:(

ही आपली pendulum motion मधली ride....पोटात गोळा येणे म्हणजे काय हे यात बसल्या वर कळले...


जत्रा म्हणले की खाण्याच्या गाड्या येणारच... hot dogs,popcorn,sugar candy,केक असे भरपूर काही मिळत होते पण फक्त फेरीवाले नव्हते...

Sunday, August 8, 2010

धबधबा आणि Inception

असच मनात आला म्हणून आम्ही या बर्जीस धबधब्याला(Burgess fall cookeville Tennessee) गेलो.२५० फुटावरून हा धबधबा खाली कोसळतो.अर्ध्या वाटे वरतीच मला एक कातील जागा सापडली म्हणून मी शेवट पर्यंत गेलोच नाही.....










मला भुंगा दिसला आणि मी वेडा झालो....धबधबा राहिला बाजूला आणि त्या भुंग्याचे मी जवळ पास ५० फोटो काढले.. चिल मध्ये रसग्रहण करत होता आणि मी कड्यावर जाऊन त्याचे फोटो घेत होतो...



मागच्या आठवड्यात Caprioचा Inception बघून आल्यावर मी वेडा झालो होतो.तेच अजून डोक्यात फिरते आहे. माझ्या University मधला हा एक corridor मला Inception सारखा वाटतो ...जास्त खोल आणि गोंधळात टाकणारा...

एकडे cookeville मध्ये उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये आम्ही हे धंदे करतो...Poet's हा आमचा कॉफी चा अड्डा आहे...


Sunday, August 1, 2010

सायकल वरून भटकंती

उन्हाळा सुट्टी असल्याने मी सायकल काढून निघायचो ...मग असच भटकणे चालू व्हायचे...cookeville downtown माझी आवडती जागा...या ATM center चा उबदार प्रकाश सही वाटला आणि त्याचा उबदार पणा मला फोटोत पण जाणवला...

एक दुर्मिळ वस्तूंचे दुकानाच्या दारातून मला हे हरिणाचे शिंग दिसले...आणि त्या शिंगामध्ये lights लावले होते.

या घराकडे बघताना काहीतरी गुढ जाणवले...आणि त्याच्या खिडकी मध्ये बघा एक बाई दिसेल तुम्हाला...

या सूर्यास्ताचा फोटो काढायला ४ मैल जावे लागले...येताना सगळा चढ होता ....

या फोटो मध्ये मला एक pattern दिसला ....cross connection आणि मला हा आवडता फोटो झाला...