Monday, December 20, 2010

Whiskey Lullaby ..एका विश्वासघाताचे गाणे !

जेंव्हा मी country ऐकायला चालू केले तेंव्हा मला गायक माहित नव्हते म्हणून मी असाच शोधाशोध करत गाणी ऐकायचो.खूप वेळा अशी सुंदर गाणी मिळायची की ती मी सतत ऐकत बसायचो...पूर्वी गाण्यांच्या बाबतीत असे माझे कधीच झाले नव्हते

लहानपणा पासून हिंदी आणि मराठी गाणी आजूबाजूच्या लोकांकडून आपल्याला समजत जातात त्याप्रमाणे आपली आवड निर्माण होते..पण मी अशी "गाणी शोधणे" वैगैरे प्रकार केले नाही....पण अशा मध्ये मला "Country गाणी शोधणे" याचे मला व्यसन कधी लागले हे समजले पण नाही...

अश्याच एका शोध मोहिमेमध्ये मला हे Brad Paisley चे हे गाणे सापडले...गाणं ऐकून झाल्या वर माझ्या भावना सुन्न झाल्या...जी काही गिटार टून आहे तीच टून वाट लावून टाकते ....

या गाण्याचे नाव आहे "Whiskey Lullaby" म्हणजे दारूचे अंगाई गीत...शब्दशः हा अर्थ थोडा विचित्र वाटेल तुम्हाला पण गाणं ऐकले की संदर्भ लागेल...



तो एक सैनिक असतो...आत्ता युद्ध संपले असते तो परत येत असताना त्याला त्याच्या प्रेयसी ने दिलेले वचन आठवत असते...खरतर म्हणजे त्या प्रेयसीच्या ओढीनेच त्याला सुखरूप आणले असते...त्याच खुशीत तो तिला भेटायला जातो आणि ......"ती आणि परपुरुष "..

तो संपतो . विश्वासघात तो सहन नाही करू शकत ..त्याचे दुःख दारूत बुडवायचा प्रयत्न करतो...तिची आठवण त्याच्या हृदयात असते त्यामुळे दारूमुळे पण तो तिला विसरू शकत नाही..."life is short but this time its bigger"....

मरताना पण तो तिला विसरू शकत नाही...कारण ती त्याची जगण्याची प्रेरणा असते..

ती पण त्याची आठवण घालवू शकत नाही...या जन्मी तिला हे शक्य नसते...ती पण दारू पिऊन त्याला भेटायला परलोकी निघून जाते...

ते दोघा कायम झोपी जाताना देवदूत Whiskey Lullaby गात असतात...
या गाण्याबरोबर याचा video पण तेवढाच घुसतो...पुढचे दोन दिवस हलवून टाकतो...

2 comments:

  1. मित्रा,

    हे गाणे ऎकून तुला हिंदीतला 'अचानक' हा विनोद खन्न्नाचा सिनेमा आठवत नाही का? अगदी असाच विषय त्यात हाताळला आहे. वेगवेगळे संगित ऎकणे ही एक पर्वणीच असते. मागे एकदा इथियोपियात मी गेलो असता तेथील लोकसंगीत मी ऎकले आणि मी असाच मोहून गेलो होतो. मला एकही शब्द कळत नव्हता पण सूर हृदयात घुसत होते.

    नितीन

    ReplyDelete
  2. नितीन,
    मी तो सिनेमा पहिला नाही पण आत्ता त्याच्या बद्दल वाचले....हो ना लोक संगीतात खूप जादू असते...जास्त संरांजाम नसतो पण गाण्याला खूप अर्थ असतो...


    ओजस...

    ReplyDelete