आजच एका मैत्रिणीशी बोलताना म्हणलो की आपले आयुष्य पण आत्ता फिल्मी झाले आहे...chat वरती बोलताना लक्षात ठेवायला लागते की तो मुलगा किंव्हा ती मुलगी मागच्या वेळी कोण बरोबर होती....असं असताना स्मरणशक्ती चा चांगला व्यायाम होतो पण असं पण वाटते की कसे कोणी एका relationship मधून दुसऱ्या मध्ये सारखे सारखे जात असतील....त्यांना किती त्रास होत असेल ?का ते एकमेकांना शिव्या घालत असतील...
माणसाचे मन फार विचित्र आहे ज्या मुली/मुला बरोबर आदल्यादिवशी पर्यंत जीव द्यायला ते तयार असते ब्रेक अप झाल्या नंतर जीव घ्यायला तयार होते...प्रेमभंग झाला की मुली हळव्या असतात म्हणून त्या रडतात पण मुलं काय करणार ? तेच या गाण्यामध्ये सांगितले आहे...Jaron चे गाणे फक्त आपल्याला प्रेमभंग झाल्या वर "फक्त प्रार्थना" करायला सांगते....:)
तो कधी चर्च मध्ये गेला नाही कारण सगळं नीट चालू होते पण नंतर जेंव्हा प्रेमभंग झाला तेंव्हा त्याने देवाचे पाय धरले....देव त्याला म्हणाला " जीने तुझी वाट लावली तिच्यासाठी वाईट चिंतून काही होत नसते तुलाच जास्त त्रास होयेल ....त्या ऐवजी तिच्यासाठी प्रार्थना कर...पुढचं मी बघून घेईन !".....;)
"तुझ्या गाडीचे ब्रेक फेल होऊदे ,तुझा वाढदिवस लोंकानी विसरला जावा....तुझ्या डोक्यावर फुलदाणी पडू दे...विमानातून उडताना विमानाचे इंजिन बंद पडू दे......अशा माझ्या अनेक प्रार्थना देवाने ऐकू दे...."
एकदम सोप्या भाषेत तो अशी मजेशीर प्रार्थना करतो...जो माझा मित्र प्रेमभंग झाल्या वर दुःखी होतो त्याला मी गाणे समर्पित करतो..."परत आनंदी होण्याची गुरुकिल्ली फक्त प्रार्थना करणे "!
(हे गाणे विनोदाचा भाग आहे ...कोणी मनाला वाईट वाटून घेऊ नये...)
No comments:
Post a Comment