सर्वकाही जे माझ्या नजरेतून मला भावते ....मी ज्याच्या प्रेमात पडतो...कधी कधी ज्याच्यामुळे मला बेक्कार कंटाळा येतो ...किडे ,रस्ते ,माणसं ,असे अनेक काही...हे नुसते फोटो नाही तर माझे विश्व आहे...
Friday, February 4, 2011
माझी ब्राझीलची मैत्रीण...
(मी माझा "अव्यक्त सर्वकाही " हा ब्लॉग बंद करतो आहे...म्हणून त्याच्या सगळ्या पोस्ट या ब्लॉग वरती टाकतो आहे..)
खूप दिवसा पासून हा विषय होता डोक्यात पण लिहिण्यासाठी वेळच होत नव्हता.मी तसा लोकात मिसळणारा मुलगा आहे त्यामुळे मित्र मैत्रिणी भरपूर .एकडे पण आल्यावर अंतरराष्ट्रीय मुला मुलींशी माझी मैत्री लगेच झाली.आज जिच्या बद्दल सांगणार आहे ती मैत्रीण माझी भारतात असताना अनपेक्षित पणे झाली...."कार्ला" माझी ब्राझीलीअन मैत्रीण.
एका मित्राच्या द्वारे तिने माझ्याशी orkut वर संपर्क केला.तिला तेव्हां भारतीय संस्कृती बद्दल माहिती पाहिजे होती.पण मुख्य अडचण होती भाषेची...कारण तिला पोर्तुगीज यायचे आणि इंग्लिश चा तिचा बाजार उठला होता.खरं तर मला फार कंटाळा यायचा तिच्याशी बोलताना कारण माझा पुणेरी इंग्लिश आणि तिचे पोर्तुगीज अशी लढाई चालायची.एक दिवस मला google translator चा उपयोग समजला आणि मग आमच्या गप्पा मस्त पैकी व्हायला लागल्या.तिला मी भारतीय इतिहास सांगितला.तिच्या ज्या भारताबद्दल चांगल्या वाईट समजुती होत्या त्या दूर केल्या.तिला सगळं ज्ञान बॉलीवूड चे सिनेमे पाहून आले होते आणि ते पण DDLJ सारखे.हे सगळं मी तिला पोर्तुगीज मधून सांगितले.ही तर सुरवात होती. जेव्हां तिच्या अभ्यासाचे काम झाले तेव्हां आम्ही अवांतर विषयावर बोलायला लागलो."arrange marriage " म्हणजे काय हे मिला १ तास पोर्तुगीज मध्ये समजून सांगितले....;)
२००९ मध्ये मी भारत सोडला आणि माझ्या नवीन जीवनाची सुरवात झाली.सगळच नवीन भाषा,लोक,प्रदेश अशा वेळी मला नाही माहित कसे पण कार्ला मदतीला आली.मी जेव्हां दमून घरी यायचो तेव्हां (ब्राझील २ तास पुढे) तिची झोपायची तयारी चालू असायची मग मी google translator उघडून बसायचो.तासनतास आमच्या गप्पा चालू व्हायच्या.मला एक एक गोष्टी हळू हळू कळत गेल्या.Recife हे ब्राझील चे समुद्राकीनार्यावरचे झकास गाव त्या गावातले लोक पण तसेच झकास आणि कार्ला याचं गावची.५ दिवस काम करायचे आणि २ दिवस मजा, कुठे रडगाणे नाही,किवा Ipad किंवा Lamborghini ची ओढ नाही.तिने मला सांगितले की आमची संस्कृती खूप free आहे त्याचा खूप लोक फायदा घेतात.त्यामुळे ब्राझील म्हणले की कार्निवल आणि सांबा नाच जगाला दिसतो पण खरे ब्राझील वेगळे आहे.त्यांची पण खूप जुनी संस्कृती आहे.कार्लाचे कुटुंब पण pure catholic आहे.मला हळू हळू ब्राझील ची खरी ओळख पटत गेली.कार्ला चा weak point म्हणजे तिची Family (शेवटी सगळ्या मुली सारख्याच;))
एकदा तिने मला विचारले की तुझ्या देशात लोक दोन लग्न करतात का?(Bollywood च्या ना ..)मी म्हणलो "हो"..तिचे उत्तर होते की "तुझ्या आई ला कार्ला दुसरी सून म्हणून चालेल का ?". मी विकेट काढायला गेलो आणि माझीच दांडी उडवली.
मला उमजले की इच्छा असेल तर भाषा, अंतर या गोष्टी आड येत नाही.आता तर मी तिच्या बरोबर बेक्कार गप्पा मारतो.त्यातून मध्ये football चा worldcup आला .तिने मला एक ब्राझील चा t shirt आणि एक teddy bear पाठवला.मी पण क्रिकेट ला support करतो तसं ब्राझील ला फुल जीव लावून support केला.तिने पण क्रिकेट बघायला सुरवात केली . सचिन ची ती बेक्कार fan आहे...माझ्या पुण्याच्या गोष्टी ऐकून तिने मला एकदा विचारले की तू नोकरी का नाही केली शिकत असताना,आमच्या एकडे तसं केले तर त्या मुलाला मुलगी कधीच मिळणार नाही...मी पण शांत झालो कारण आपल्या एकडे नोकरी म्हणजे शिक्षण झाल्या वर असे समीकरण आहे.तिच्या आईशी बोललो तर मला दाते काकूंची आठवण झाली,सेम टू सेम फक्त भाषा वेगळी.त्यांना गोव्याला याचे आहे एकदा तरी आयुष्यात,सेंट झेवियर चर्च त्यांचे धर्मास्तान आहे.अशी २ वर्ष कधी गेली कळल पण नाही ,कार्ला बरोबर माझी wavelength कधी जुळली आणि कशी काय जुळली हे एक कोडे आहे .
मी आणि ती लोकांना कधी पटवून द्यायच्या फंदात पडलो नाही की आमची मैत्री खरी का खोटी कारण काही झाला तरी मी तिला कधी भेटलो नाही आणि ती मला..पण आम्ही दोघांशी प्रामाणिक राहिलो म्हणून निखळ मैत्री झाली.Social Networking site वरून चांगली मैत्री होऊ शकते हे लोकांना कधी पटणार नाही.वेगळी भाषा,वेगळी संस्कृती असून मला तिचा विश्वास टिकवण्यासाठी कधी तडफड करावी लागली नाही यातच सगळे मैत्रीचे गुपित आहे.ती पण आत्ता इंग्लिश,मराठी शिकत आहे आणि मी पोर्तुगीज कारण पुढच्या आयुष्यात एकदा तरी विधात्याने भेट लिहिली आहे..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment