Friday, February 4, 2011

एका गारुड्याचा जन्म...


(मी माझा "अव्यक्त सर्वकाही " हा ब्लॉग बंद करतो आहे...म्हणून त्याच्या सगळ्या पोस्ट या ब्लॉग वरती टाकतो आहे..)

आत्ताच नागपंचमी होऊन गेली तेव्हां मला अनेक नवीन मित्रांनी नेहमीचा प्रश्न विचारला " तू साप पकडायला कसा काय लागलास ?"(हा प्रश्न मला आत्ता पर्यंत अनेक भारतीय ,चीनी,अमेरिकन लोकांनी आश्चर्य दाखवत विचारला आहे .) तसा पाहता मी एक केमिकल इंजिनियर आणि चष्मा घालणारा बारीक मुलगा आहे त्यामुळे आधी लोकांचा विश्वास बसत नाही की मी पुण्यात लोकांच्या घरी जाऊन साप पकडायचो(clean shave आणि चष्मा हा गारुडी लोकांच्या फ्रेम मध्ये बसत नाही ! )...

याची सुरवात मी engineering च्या पहिल्या वर्षाला असताना झाली.तेव्हां मी ड्रॉप घेतला होता त्यामुळे माझ्या कडे जवळपास ८ ते ९ महिने होते. आई बाबा मला कुठले कुठले course करायला सांगत होते आणि मी "हो हो " म्हणत दिवस काढत होतो ..नेहमी सारखे "पुढे काय ?" हा प्रश्न होताच .जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात माझ्या काका च्या एका युरोपिअन बॉस ला पुणे फिरवता फिरावता कात्रज सर्पोद्यान ला घेऊन गेलो .तिकडे माझी एक लांबची मैत्रीण काम करायची तिने आम्हाला सर्पोद्यान फिरून दाखवले.खरं सांगतो तेव्हां मला एक पण साप ओळखता येत नव्हता.सगळे लोक बघतात तसे मी "आएला तो बघ ,ती मगर हलत का नाही ? " असे प्रश्न विचारत फिरलो .घरी आलो आणि विचार आला की "आपण जाऊ शकतो का सर्पोद्यान मध्ये कामाला ?"(कशाच्या बळावर तो विचार आला ते अजून मला माहित नाही. )तो दिवस होता ३० जानेवारी !
दुसऱ्या दिवशी गाडी काढून तडक सर्पोद्यानात गेलो. "राजाभाऊ" सर्पोद्यानाचे manager त्यांना सांगितलं,"मला निसर्ग आवडतो ! आणि मला आत्ता वेळ आहे ! " या दोन वाक्यामध्ये माझी सर्पोद्यान मध्ये एन्ट्री झाली.त्यांनी पण चेहरयाकडे बघून सांगितले "येत जा उद्या पासून, पण तुला कोणी काही हात धरून शिकवणार नाही ,discovery channel वर दिसते तेवढे हे सोपे नाही ....."

मी चिल मारत घरी आलो कारण आत्ता मला काम मिळाले होते .आईबाबांना सांगितले की मी उद्यापासून सर्पोद्यान मध्ये काम करायला जाणार आहे , तेव्हां ते आधी त्यांना मी काय बोलतो आहे तेच झेपायला वेळ लागला ...(माझ्या सात पिढ्यांमध्ये कुत्रा पण कधी कोणी पाळला नव्हता !)पोराचे हे खूळ उतरेल काही दिवसात असे वाटल्याने मला परवानगी मिळाली .पण हे खूळ कधीच कधीच उतेरले नाही .....
पुढचे ७ महिने मी सर्पोद्यानला वाहून घेतले.सुरवातीचे दिवस बिलकुल सोपे नव्हते पण एक बरे होते की मला माझी मर्यादा माहित होती.झाडांना पाणी घाल ,कासवाचे cage साफ कर ,साफ सफाई कर अशी खूप साधी कामे केली .नंतर हळू हळू राजाभाऊ आणि अण्णांचा विश्वास बसत गेला तसे तसे मी सर्पोद्यानचा होऊन गेलो.साप कसे काय मला ओळखायला लागले मी त्यांना पकडायला कसा शिकलो मला पण माहित नाही.जगातल्या सर्वोत्तम लोकांच्या बरोबर काम केल्यामुळे सगळं जमून गेलं.त्यादिवासामध्ये मी घरी फक्त ४०% सांगायचो ."सुसरीच्या pit मध्ये उतरून साफ करायचो!" अशा गोष्टी सांगितल्या असत्या तर आईला वेड लागले असते...तिकडचे लोक करू शकतात तर मी पण करू शकतो एवढंच विचार करून मी काम करायचो.कधी कधी विचार न करता पण पण अवघड कामे करायचो नंतर वाटायचे की विचार केला असता तर हे काम नसतो करू शकलो.("सोचुंगा तो करूंगा कैसे!").त्याच काळामध्ये मी राजाभाऊ बरोबर पुण्यामध्ये लोकांच्या घरात आलेले साप पकडायला जायचो.बाबा (पटवर्धन )बरोबर लोकांचे कॉल करायचो .(कॉल मध्ये विषारी,बिनविषारी साप,घोरपड,घर,घुबड असे अनेक काही ...)रोज वेगळीच excitement असायची .

नंतर college चालू झाल्या पासून मला एकट्याला कॉल यायला लागले .(मित्र मला कॉल बॉय म्हणायचे !)माझी सापाची पिशवी आणि स्टिक तयार असायची. कॉल आल्यावर कमीत कमी वेळे मध्ये पत्ता विचारून तिथे पोचणे स्किल असायचे .त्यातून पुण्यात पत्ता विचाराने म्हणजे लोकांचे १०० प्रश्न्न !असे करून त्या जागी पोचणे लोकांचा अंदाज घेणे,साप कुठे आहे ,जातीचा अंदाज आणि मग शेवटचे म्हणजे पकडून त्याला पिशवी मध्ये टाकायचा.मग चालू व्हायचे लोकांचे असंख्य प्रश्न . यासगळ्या कॉल मधले साप पकडणे फक्त जास्तीतजास्त ५ मिनटे चालायचे .लोकांना सांभाळणे कठीण काम असायचे.
सुरवातीला हे सगळं मी नवीन अनुभव म्हणून बघायला लागलो.पण हळू हळू "लोकांमध्ये साप पकडणे हे खूप जवाबदारी चे काम आहे हे मला कळले .हे सर्पोद्यानचे काम घरचे कार्य असल्यासारखे करायला लागलो.बाबाना तर वाटायचे की पोरगा गेलं हाताबाहेर ! पण काही दिवसातच त्यांना "सापवाल्याचे आईबाबा " असे ओळखायला लागल्यामुळे नंतर त्यांनी कधी मला अडवले नाही ."लोकांचा विश्वास आणि साप वाचवणे" या गोष्टी मी गारुडी बनून मिळवल्या.
मित्रांमध्ये मी गारुडी म्हणूनच ओळखला जातो .मला खूप बरे वाटते की या गारुड्याचा जन्म झाला त्यामुळे काही प्रमाणात तरी पुण्यातले साप वाचले !
(फक्त मी साप का पकडायला लागलो हेच मला लिहायचे होते..अजून या वरचे खूप लेख पुढे येणार आहेत...;) ...)
(Courtesy to gettyimages.com)

No comments:

Post a Comment