Friday, February 4, 2011

असली "चमेली" !



(मी माझा "अव्यक्त सर्वकाही " हा ब्लॉग बंद करतो आहे...म्हणून त्याच्या सगळ्या पोस्ट या ब्लॉग वरती टाकतो आहे..)

मी दुर्गापूर ला city center या शहराच्या मध्यवर्ती भागात एकटा राहायचो.मी माझी गाडी पुण्यावरून तिकडे घेऊन गेल्यामुळे मला मस्त पणे सगळी कडे फिरता यायचे.खूप खायचो-प्यायचो मजा करायचो.मला नवीन गावामध्ये नवीन नवीन दुकाने शोधण्याची सवय आहे .त्यामुळे माझा timepass होतो आणि नवीन लोकांशी ओळखी होतात . असाच एक मी ज्यूस वाला शोधून काढला होता. त्याचे दुकानं city center च्या बस stop जवळ होते त्यामुळे ते बेक्कार चालायचे.त्याचा नाव "छोटे" होते.छोटे सुंदरबन (पं.बंगाल) वरून दुर्गापूर ला नशीब काढायला आला होता.
त्याच्याशी मी खूप गप्पा मारायचो.तो बंगली लोकांचे किस्से सांगायचा. माझी पण बंगाली ची practice व्हायची.त्याला वाटायचे की मी मुंबई च्या जवळ राहतो म्हणजे मी करीना कपूर ला खूप वेळा भेटलो आहे.त्याच्या म्हणण्यानुसार एका गावातली माणसं एकमेकांना ओळखत असतात.म्हणून तो मला करीना कपूर बद्दल खूप काही विचारायचा.असे आमचे सवांद चालायचे .

असच एकदा संध्याकाळी मी त्याच्या कडे जाऊन करीना बद्दल त्याच्याशी गप्पा मारत होतो.तेवढ्यात एक family आली आणि माझ्या बाजूच्या खुर्ची वर बसली.तो त्यांना ज्यूस बद्दल विचारत होता तो पर्यंत मी निरीक्षण करत बसलो. दोन मुली आणि आई बाबा अशी family होती.एक मुलगी नववी आणि दुसरी बारावी पर्यंत असेल .कपड्या वरून जरा बऱ्या घरचे दिसत होते.छोटे ने ज्यूस दिला आणि परत आमच्या गप्पा करीना वरून चालू झाल्या.त्या मुली पण आमच्या गप्पा मध्ये सहभागी झाल्या.मला काहीतरी वेगळे वाटत होते पण काय ते सांगता येत नव्हते.

छोटे ला एवढे आवडत नव्हते की मी त्यांच्याशी बोलतो आहे. तो सारखा विषय बदलायचा प्रयत्न करत होता.मी आपला chill मारत होतो. येवढ्यात एक माणूस आला maruti van मधून आणि तो मुलींचा बाबा त्याच्याशी बोलयला गेला.मला एवढंच कळले की ते पैश्याच्या गोष्टी करत आहेत.काही तरी "कित्तू दाम ,कितना होबे " असे काही तरी बोलत होते. "५ हजार टाका " हे मला शेवटचे शब्द ऐकू आले.त्या नंतर ती Family गाडी मध्ये बसून निघून गेली.
माझ्या कडे बघत छोटे ने शांत पणे विचारले, "क्या साब, असली "चमेली" को देखा क्या ?"

मला ते डोक्यात जायला २ सेकंद लागले आणि मी मुळापासून हादरलो.त्या सातवी तल्या मुलीचा चेहरा डोळ्यासमोर आला .ज्यांच्याशी आपण इतक्या वेळ बोलत होतो त्या वेश्या होत्या हे माझा तूपभात मन मानायला तयार नव्हते.तो छोटे बोलत होता पण मला काही ऐकू येत नव्हते . स्वदेस मध्ये शाहरुख जसा सुन्न होतो त्या पेक्षा मी बेक्कार सुन्न झालो .मी गप् केले छोटे ला आणि सुटलो तिकडून .....एक कटींग टाकल्यावर डोकं ताळ्यावर आलं...

मी चमेली पहिला आहे किवा डॉ.अनिल अवचटांचे "उभे धागे आडवे धागे " मधला कामाठीपुरा चा लेख वाचला आहे.या विषयाबद्दल वाचून आणि चांगल्या media मधून बराचसा परिचित आहे.मित्रांबरोबर या विषयावर चर्चा पण केल्या आहेत.पण त्या क्षणी मला खूप भीती वाटली.त्या प्रंसगी त्या वेश्या जर ओठाला लाली लावून माझ्या समोर असत्या तर मला जास्त काही वाटलं नसतं.पण एकडे पूर्ण चित्रच फ्रेम सोडून बाहेर गेले होते.आत्ता पण ती शाळेतली वाटणारी लहान मुलगी काय काय सहन करत असेल याची मी कल्पना पण करू शकत नाही."वेश्या "ही शिवी नाही ती पण माणसं आहेत हे त्यादिवशी प्रत्यक्ष जाणवले मला.नशिबाने"मजबुरी "काय असते याची झळ आपल्या पैकी बहुतेकांना कधी लागणार नाही.पण वेश्या हा शब्दच मजबुरी मधून तयार झाला आहे.मी सुरक्षित समाजामध्ये वाढलो यासाठी मी समाजाचा नेहमीच ऋणी आहे.
शेवटचे ,हा किस्सा मी अनेक लोकांना सांगितला पण सगळ्यांची एकच reaction होती ती म्हणजे कुहुतुल.!!! आणि याचं reaction ने मला या किस्स्यापेक्षा जास्त हलवून टाकले

(Courtesy to google.com)

No comments:

Post a Comment